
कॉक्रोच जनता पार्टीने हिंदुस्थानात सरकारला घाम फोडला असताना कॉक्रोचच्या मुद्दय़ावरून लंडनमध्येही गोंधळ झाला. येथील बर्कबेक महाविद्यालयात व्याख्यानासाठी गेलेले सरन्यायाधीश सूर्य कांत यांना झुरळांबद्दलच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. हिंदुस्थानातील लोकशाहीची स्थिती व वाढत्या असंतोषाबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे त्यांची गोची झाली. हे पाहून सूत्रसंचालकाने हस्तक्षेप केला. आजचा विषय ‘एआय आणि आंतरराष्ट्रीय कायदा’ असा आहे. इतर प्रश्न विचारता येणार नाही, असे त्याने सांगितले. मात्र, प्रश्नकर्ते उभे राहून हातवारे करू लागल्याने गोंधळ उडाला. हिंदुस्थानने या गोंधळाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
























































