
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि विनोदवीर श्रमेश बेटकर आता एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉकटेल स्टुडिओ प्रस्तुत ‘थोडं नॉटी, थोडं थॉटी’ हा त्याचा पहिला स्वतंत्र मराठी स्टँड-अप
कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. दैनंदिन आयुष्यातील गमतीजमती, नातेसंबंध, कॉर्पोरेट संस्कृती, जेन झीचे जग, मुंबईकरांचे अनुभव आणि मराठी मध्यमवर्गीय जीवन यावर आधारित हा शो प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच विचार करायलाही भाग पाडणार आहे. या शोची संकल्पना, निर्मिती आणि व्यवस्थापन कॉकटेल स्टुडिओ करत असून भविष्यात हा शो महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये, महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये, कॉर्पोरेट कार्यक्रमांमध्ये तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याचा मानस आहे.






























































