NEET पेपरफुटीविरोधात Gen Z रस्त्यावर; चौकशी करण्यासह धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील घोटाळ्याचा मुद्दा देशभरात गाजत आहे. या विरोधात देशभरात Gen Z रस्त्यावर उतरले असून विरोधी पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला आहे. परीक्षांवरून उडालेल्या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, NTA बरखास्त करण्यात यावे आणि या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी तरुणांची मागणी आहे.

नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील घोटाळ्यांच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे देशभरातही तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.

भुवनेश्वर, भोपाल, रांची, जोधपूर,अहमदाबाद, हैदराबाद, अमरावती आणि दिल्लीसह देशभरात प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह या प्रकरणाच्या चोकशीच्या मागणीसाठी Gen Z निदर्शने आणि आंदोलने करत आहे. तरुणाईच्या या मागणीकडे सरकार लक्ष देणार आहे का? असा संतप्त सवालही सोशल मिडीयावर उपस्थित करण्यात येत आहे.