
लकी बांबू प्लांट चुकीच्या पद्धतीने लावले तर त्याची वाढ होत नाही. त्याची पाने पिवळी पडतात. बांबू प्लांटची मातीत जलद वाढ होते. पाण्यातसुद्धा ते वाढू शकते. दीर्घकाळ राहते. 8-10 दिवसांनी पाणी बदलावे.
मातीत लावलेल्या लकी बांबूची उंची वेगाने वाढते. त्याला नवीन पालवी फुटते. कुंडीतील माती पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. जर आपल्याला घर सजावटीसाठी लकी बांबू ठेवायचा असेल तर पाण्यात ठेवणे हा उत्तम पर्याय आहे.





























































