मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळणार, अब्दुल कलामांऐवजी हाजी बाबांच्या नावाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मांडवी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (मांडवी आयटीआय) नामांतराच्या मागणीचा वाद पेटणार अशी चिन्हे आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्यातील चौदा आयटीआयची नावे बदलण्यात आली. त्यानंतर मांडवी आयटीआयला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. पण या नावाऐवजी या आयटीआयचे नामकरण हाजी अब्दुल रहमान शाह बाबा करावे, अशी मागणी स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी केली आहे.

मांडवी येथील शासकीय औद्यगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय २०२४ रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. पण अमीन पटेल यांनी हे नाव बदलून हाजी अब्दुल रहमान शाह बाबा ठेवण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. पण कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हाजी अब्दुल रहमान शाह बाबा यांच्या नावाच्या मागणीला विरोध केला आहे. यामुळे आयटीआय नामांतरावरून वाद होण्याची शक्यता आहे.