दिव्यांशच्या फटकेबाजीमुळे अंधेरी अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा स्टार अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे आणि सलामीवीर दिव्यांश सक्सेना यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आर्क्स अंधेरी संघाने टी-20 मुंबई लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. आर्क्स अंधेरी संघाने ईगल ठाणे स्ट्रायकर्सवर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा संघ केवळ 129 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात सलामीवीर दिव्यांशच्या अवघ्या 39 चेंडूंतील 12 चौकार आणि चार षटकारांनी सजलेल्या शानदार नाबाद 88 धावांच्या जोरावर आर्क्स अंधेरीने 50 चेंडू शिल्लक असताना सहज विजय मिळवला. दिव्यांशने सुरुवातीपासूनच स्ट्रायकर्सच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले आणि केवळ 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करून स्पर्धेतील संयुक्त सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले. दुसऱया टोकाला आयुष जेठवाने (25) हुशारीने स्ट्राईक रोटेट करत आदर्श साथ दिली आणि दिव्यांशला खेळावर नियंत्रण ठेवू दिले. या जोडीने स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांना गोंधळात टाकले आणि ते हळूहळू लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करू लागले.

संक्षिप्त धावफलक ः ईगल ठाणे स्ट्रायकर्स – 20 षटकांत 129 धावा (साईराज पाटील 34, एकनाथ केरकर 27; प्रसून सिंग 3/22, अजय मिश्रा 2/13, शिवम दुबे 2/19) पराभूत विरुद्ध आर्क्स अंधेरी – 11.4 षटकांत 130/1 (दिव्यांश सक्सेना नाबाद 88, आयुष जेठवा 25).