ट्रेंड – कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी काकांचा जबरदस्त जुगाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राण्यांचा लळा असणारे अनेक जण कुत्रे, मांजरींसारखे पाळीव प्राणी पाळतात. मात्र या प्राण्यांना लहान मुलांप्रमाणे सकाळ, दुपार, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाणे काही लोकांसमोर एक आव्हानच असते. काहींना आळस तर काहीना व्याधींमुळे त्या प्राण्यांना फेरफटका मारण्यासाठी नेता येत नाही. मात्र एका काकांनी कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी जबरदस्त जुगाड लावला आहे. या काकांनी गाडी एका पार्कमध्ये आणली आणि कुत्र्याच्या गळय़ातील पट्टा स्कुटीला बांधून हे काका हळूहळू त्या कुत्र्यासोबत पुढे जात आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याच्यावर लाईक, कमेंटस्चा पाऊस पाडला आहे. हा व्हिडीओ adhyayanÀandey_jii या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.