
बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम खान यांनी आपल्या एका जुन्या गाजलेल्या चित्रपटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजूबा’ या बिग बजेट चित्रपटात सोनम खान यांनी बाथटब सीन दिला होता. त्यावेळी या सीनच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. आता जवळपास 35 वर्षानंतर पडद्यामागचे सत्य त्यांनी समोर आणले आहे.
बाथटबचा सीन चित्रित करताना मी विवस्त्र नव्हते, तर अंगावर स्किन कलरचा बॉडीसूट परिधान केला होता, अशी माहिती सोनम यांनी दिली. विशेष म्हणजे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनीही चित्रिकरण सुरू असताना कपड काढण्यास सांगितले होते, मात्र आपण विना-कपड्यांचे दृश्य देण्यास ठाम नकार दिला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोनम खानने यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर अजूबा चित्रपटातील या गाजलेल्या दृश्याचा एक व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 80 च्या दशकाच्या उत्तरार्धातील ही एक आठवण आहे. या बाथटब दृश्यात एक मोठा ट्विस्ट होता. मी तिथे पूर्ण कपड्यांमध्ये होते. माझ्यावर विश्वास ठेवा. हा एक स्लिन कलरचा बॉडीसूट होता. त्यामुळे प्रेक्षकांनी आपल्या कल्पनेला येथेच लगाम घालावा, असे कॅप्शनही त्यांनी दिले
View this post on Instagram
या दृश्यामध्ये पुढे असणारा मल्टी-मिरर शॉट हा माझा नव्हता. त्या भागासाठी डमी अभिनेत्रीचा वापर करण्यात आला होता. तिलाही पूर्ण स्किन-कलर वन-पीस देण्यात आला होता. मी स्वतः विना-बॉडीसूट हे दृश्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनीही माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर हे संपूर्ण दृश्य आम्ही अवघ्या एका तासात शूट करून संपवले, जो एक रेकॉर्डच होता, असेही सोनम खान यांनी सांगितले.
दरम्यान, अजूबा या चित्रपटात अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, डिंपल कपाडिया, शम्मी कपूर आणि अमरीश पुरी यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज होती. 80 आणि 90 च्या दशकात ‘त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, ‘क्रोध’ आणि ‘फतेह’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनम खान यांनी करिअरच्या शिखरावर असतानाच लग्न करून चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता व त्या परदेशात स्थायिक झाल्या.





























































