न्यूझीलंड दौऱ्यावर क्रिकेटची संपूर्ण मेजवानी; हिंदुस्थानी संघ पाच टी-20, पाच वन डे आणि दोन कसोटी खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक आज बीसीसीआयने जाहीर केले. हा दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांत पाच वन डे सामने खेळवले जातील. वेलिंग्टन आणि ख्राईस्टचर्च येथे दोन कसोटी सामने खेळवले जातील.

सहा वर्षांनंतर न्यूझीलंडचा दौरा

हिंदुस्थानी संघ बऱ्याच कालावधीनंतर कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहे. हिंदुस्थानने शेवटचा न्यूझीलंड दौरा 2019/20 मध्ये केला होता. पण त्यानंतर किवी संघाने दोनदा हिंदुस्थानाचा दौरा केला आहे, ज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या 2024/25 च्या दौऱ्याचा समावेश आहे. जिथे न्यूझीलंडने हिंदुस्थानला कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला होता. यामुळे हिंदुस्थानी संघाला न्यूझीलंडच्या भूमीवर त्या पराभवाचा बदला घेण्याची एक मोठी संधी मिळेल.

विराट आणि रोहित पुन्हा दिसणार

वन डे मालिका चाहत्यांसाठी खूप खास असेल. कारण दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा एकदिवसीय जर्सीमध्ये दिसणार आहेत.

हिंदुस्थानचे न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
पाच टी-20 सामन्यांची मालिका
(सर्व सामने रात्री 8ः00 वाजता सुरू होतील)
 22 ऑक्टोबर, पहिला टी-20 सामना, ख्राईस्टचर्च
 24 ऑक्टोबर, दुसरा टी-20 सामना, ख्राईस्टचर्च
 27 ऑक्टोबर, तिसरा टी-20 सामना, वेलिंग्टन
 30 ऑक्टोबर, चौथा टी-20 सामना, ऑकलंड
 1 नोव्हेंबर, पाचवा टी-20 सामना, हॅमिल्टन
पाच वन डे सामन्यांची मालिका (सर्व सामने दुपारी 3.00 वाजता सुरू होतील)
 4 नोव्हेंबर, पहिला एकदिवसीय सामना, ऑकलंड
 7 नोव्हेंबर, दुसरा एकदिवसीय सामना, वेलिंग्टन
 10 नोव्हेंबर, तिसरा एकदिवसीय सामना, हॅमिल्टन
 13 नोव्हेंबर, चौथा एकदिवसीय सामना, टॉरंगा
 15 नोव्हेंबर, पाचवा एकदिवसीय सामना, टॉरंगा
दोन कसोटी सामन्यांची मालिका (दोन्ही सामने सकाळी 11.00 वाजता सुरू होतील)
 19-23 नोव्हेंबर, पहिली कसोटी, वेलिंग्टन
 27 नोव्हेंबर – 1 डिसेंबर, दुसरी कसोटी, ख्राईस्टचर्च