
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चार वर्षांच्या सेवाकालाच्या अटीवर आधारित ही योजना सशस्त्र दलांच्या मूलभूत रचनेविरोधात असल्याचा आरोप करत त्यांनी शहीद अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच अदानीला पैसे देण्यासाठी अग्नीवीर योजना आणली असेही राहुल गांधी म्हणाले.
उत्तराखंडच्या एका सभेला ऑनलाईन संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने सशस्त्र दलांमध्ये अग्निवीर योजना आणली असून त्यामध्ये केवळ चार वर्षे सेवा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र एखादा अग्निवीर जवान देशासाठी शहीद झाला, तर त्याच्या कुटुंबाला पुरेशी सुरक्षा आणि संरक्षण मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.
अग्निवीर योजना सशस्त्र दलांच्या पायाभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस या व्यवस्थेच्या विरोधात आहे. देशातील कोट्यवधी युवक सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहतात आणि त्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्यामुळे अशा युवकांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे संरक्षण आणि भवितव्य सुरक्षित राहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी संरक्षण अर्थसंकल्पाच्या वापराबाबतही केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षण अर्थसंकल्पाचा निधी सैनिक आणि सशस्त्र दलांच्या बळकटीकरणासाठी न वापरता तो उद्योगपती गौतम अदानी यांच्यासारख्या अब्जाधीशांच्या फायद्यासाठी वळवायचा आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. याच कारणामुळे अग्निवीरसारखी योजना आणण्यात आल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या संरक्षण धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मोदी सरकार सेनाओं में अग्निवीर लेकर आई, जिसमें 4 साल सेवा देने की बात कही गई, लेकिन अगर अग्निवीर शहीद होगा तो देश उनके परिवार को सुरक्षा नहीं देगा।
ये सेनाओं की नींव के खिलाफ है और हम इस सिस्टम के खिलाफ हैं।
देश के करोड़ों युवा सेना में जाते हैं और जाने का सपना देखते हैं,… pic.twitter.com/7nLD58FdhY
— Congress (@INCIndia) June 4, 2026


























































