सुखोई फायटर जेटचे नवी मुंबई विमानतळावर लॅण्डिंग, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी वायुदलाच्या सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानाने यशस्वी लॅण्डिंग केले. आकाशात घिरटय़ा घालणाऱ्या सुखोईने अचानक विमानतळाच्या धावपट्टीला स्पर्श केल्यानंतर प्रचंड आवाज झाला आणि परिसर दणाणून गेला. या लॅण्डिंगचे फोटो आणि व्हिडीओ वायुदलाच्या दक्षिण-पश्चिम वायू कमांडच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले असून ते तुफान व्हायरल झाले आहेत.

नवी मुंबई किमानतळ क्याकसायिक उड्डाणांसाठी सज्ज झालेले असतानाच कायुसेनेच्या लढाऊ किमानाची ही चाचणी अत्यंत महत्त्कपूर्ण मानली जात आहे. कोणत्याही आपत्कालीन किंका युद्धजन्य परिस्थितीत नागरी किमानतळांचा कापर लढाऊ किमानांसाठी केला जाऊ शकतो, हे या चाचणीमुळे स्पष्ट झाले आहे. विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वी सप्टेंबर 2024मध्ये या विमानतळावर हवाई दलाच्या आयएएफ सी-295 या विमानाचे यशस्वी लॅण्डिंग झाले होते. त्यानंतर एक महिन्याने इंडिगोच्या ए-320 या विमानाने धावपट्टीची चाचणी घेतली होती.