
डाळ केवळ पचायला हलकी नसते, तर शरीराला अनेक फायदेही देते. अनेक लोक सकाळच्या जेवणात डाळ बनवतात, तर काही जण रात्री सुक्या भाज्यांसोबत डाळ खाणे पसंत करतात. पण रात्री डाळ खाणे योग्य आहे का? रात्री डाळ खाल्ल्यास काय होते ? जाणुन घ्या
आयुर्वेदानुसार, झोपण्यापूर्वी नेहमी हलके जेवण करावे. त्यामुळे, रात्री डाळ खाल्ल्याने अपचनासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला तरीही रात्री डाळ खायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात मूग डाळीसारख्या सहज पचणाऱ्या डाळींचा समावेश करू शकता.
डाळी खाण्याची योग्य वेळ कोणती आहे?
डाळी खाण्याची सर्वोत्तम वेळ दुपारची आहे. याचे कारण असे की, या वेळी चयापचय क्रिया जलद असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
रात्री डाळ खाण्याचे तोटे कोणते?
- वजन कमी करायचे आहे त्यांनी रात्री कडधान्ये खाणे टाळावे.
- अपचन किंवा गॅससारख्या पोटाच्या समस्यांचा त्रास होतो त्यांनी तूर, मसूर आणि उडीद डाळ यांचे सेवन टाळावे.
- रात्री झोप लागत नाही, त्यांनी रात्री कडधान्ये खाणे टाळावे.
- डाळी खाल्ल्याने पोटदुखी आणि बद्धकोष्ठता होऊ शकते, यामुळे ज्या लोकांना मूत्रपिंडासंबंधी समस्या आहेत त्यांनी रात्री डाळी खाणे टाळावे.






























































