
तामीळनाडूमधील भाजपचे प्रमुख नेते के. अन्नामलाई यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देणारे अन्नामलाई आता नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. अन्नामलाई यांच्या नव्या राजकीय पक्षाची लवकरच घोषणा केली जाणार आहे.
तामीळनाडूत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत थलापति विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या नव्या पक्षाला 100 हून अधिक जागा मिळाल्या, तर भाजपच्या पदरी निराशा पडल्याने अन्नामलाई यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अन्नामलाई आता नव्या पक्षाची स्थापना करणार असून त्यांचा हा पक्ष प्रादेशिक पक्ष असणार आहे. तामीळनाडूत सध्या राष्ट्रीय पक्षाला थेट मुख्य प्रवाहात येणे कठीण आहे. त्यामुळे सर्व घटकांना एकत्र घेऊन जाणारा प्रादेशिक पक्ष हाच सक्षम पर्याय ठरू शकते, असा अन्नामलाई यांना विश्वास आहे.



























































