नीट पेपरफुटीचे धागेदोरे कल्याणपर्यंत, विद्यार्थिनीची सीबीआयकडून चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे कनेक्शन आता कल्याणपर्यंत पोहोचले आहे. कल्याणमधील म्हारळ परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची सीबीआयच्या पथकाने या प्रकरणी चौकशी केली आहे. या प्रकरणातील संशयित विद्यार्थ्यांचे कॉल डिटेल्सची छाननी करत असताना या विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे. चौकशी झालेल्या विद्यार्थिनीचा पेपरफुटी प्रकरणात सहभाग आहे की नाही, याचा सीबीआयकडून तपास सुरू आहे.

नीट प्रकरणातील संशयितांच्या यादीत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या कॉल डिटेल्स आणि संपका&ंची छाननी करताना कल्याणमधील या विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर आढळून आला. सीबीआयच्या पथकाने कल्याण गाठले आणि या विद्यार्थिनीची चौकशी केली. दरम्यान यासंदर्भात विद्यार्थिनीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या मुलीचा एका विद्यार्थ्यांसोबत संपर्क होता आणि त्याच कारणामुळे तिचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.