
आइस मेकचा महसूल २५६ कोटींवर आइस मेक रेफ्रिजरेशन
लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६च्या चौथ्या तिमाहीत आणि संपूर्ण वर्षात भक्कम आर्थिक कामगिरी नोंदवत आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही महसूल प्राप्त केला आहे. कंपनीचा एकत्रित महसूल आर्थिक वर्ष २०२६मध्ये २५५.८५ कोटी इतका नोंदवला गेला.
मॅरिट्रोनिरुस्तमजीची भागीदारी
रुस्तमजी ग्रुपने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कवळे चेक डॅम प्रकल्पाला पाठबळ देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टसोबत भागीदारी केली. हंगामी पर्जन्यमान मुबलक असूनही येथे पाणीटंचाई उद्भवते. या समस्येला तोंड देण्यास मदत होईल.
भागीदारी करार
ओस्लो येथील हिंदुस्थान-नॉर्वे बिझनेस अँड रिसर्च समिटमध्ये व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार प्रभावीपणे राबविण्यावर विशेष भर देण्यात आला. या कराराद्वारे हिंदुस्थानात जवळपास १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. या परिषदेत रिलायन्स, टाटा समूह, लार्सन अँड टुब्रो उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व होते.
सरकारी पेन्शन स्कीम अटल पेन्शन योजनेतून जवळपास १.४९ कोटी लोकांचा पत्ता कट करण्यात आला आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी या योजनेत नोंदणी केली जाते. परंतु खाते बंद करणे आणि मृत्यूमुळे बाहेर पडणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर प्रचंड गाजावाजा करून २०१५मध्ये अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत अटल पेन्शन योजनेंतर्गत एकूण नोंदणी ८.९६ कोटीपर्यंत होती. परंतु आता केवळ ७.४५ कोटी नोंदणी उरली आहे. याचा
१ जुलैपासून एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना झटका
एसबीआयने क्रेडिट कार्डधारकांना जोरदार झटका दिला आहे. येत्या १ जुलैपासून फोन पेवरून एसबीआय क्रेडिट कार्ड पर्पल आणि फोन पे एसबीआय क्रेडिट कार्ड सिलेक्ट ब्लॅकचा वापर केल्यास दोन्ही क्रेडिट कार्ड्ससाठी रिवॉर्ड पॉइंट्स कमी होणार आहेत. तर काही देवाणघेवाण रिवॉर्ड्स पॉइंट्स पूर्णपणे बंद केले जाणार आहेत. हे नियम १ जुलै २०२६पासून बदलणार आहेत. ऑनलाइन ट्रान्झेंक्शनवरसुद्धा ही मर्यादा लागू आहे. १ जुलैपासून ही मर्यादा २५० करण्यात आली आहे. तर अन्य फोन पे खर्चावर ही मर्यादा ७५० रुपये करण्यात आली आहे.
अॅमेझॉन बेडरॉकवर क्रेडची नवी प्रणाली
क्रेड या फिनटेकने ‘क्रेड कोडलेन्स’ ही नवी प्रणाली विकसित केली आहे. अॅमेझॉन बेडरॉकच्या सहाय्याने विकसित केलेल्या या प्रणालीमुळे कंपनीने एआय-आधारित कार्यप्रक्रियेत चौपट वेग साध्य केल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या २० हून अधिक व्यावसायिक विभागांमध्ये, २००० रिपॉझिटरीज, ५००हून अधिक मायक्रो सर्व्हिसेसमध्ये ही प्रणाली वापरली जाते.
बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनचा ८६.९३ कोटींचा महसूल
बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन लि. ने मार्च २०२६मध्ये संपलेल्या आर्थिक वर्ष २०२६च्या चौथ्या तिमाहीसाठी ८६.९३ कोटी रुपयांचा एकत्रित महसूल नोंदवला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६च्या चौथ्या तिमाहीत ७.०६ कोटी रुपयांचा इबिआयटीडीए नोंदवला. आर्थिक वर्ष २०२६च्या चौथ्या तिमाहीसाठी कंपनीच्या एकत्रित उत्पादन क्षमतेचा वापर ७८ टक्के राहिला.
थेट अर्थ १.४९ कोटी खातेदारांचा पत्ता कट झाला आहे. २०१५ पासून आतापर्यंत १.४९ कोटी लोक या योजनेतून बाहेर पडले आहेत. योजनेच्या सुरुवातीला २०१५-१६ यादरम्यान केवळ दोन लोकांनी ही योजना सोडली होती. परंतु २०२५-२६ या वर्षात हा आकडा ३०.२४ लाख इतका झाला आहे.
कोटकची ‘लो-व्होलाटिलिटी ३० इंडेक्स फंड’ योजना
कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड कोटक म्युच्युअल फंडतर्फे कोटक निफ्टी अल्फा लो-व्होलाटिलिटी ३० इंडेक्स या नवीन म्युच्युअल फंड आणला आहे. या वेळी कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह, कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि फंड व्यवस्थापक देवेंदर सिंघल उपस्थित होते. ही मुदत-मुक्त योजना असून ती ‘निफ्टी अल्फा लो-व्होलाटिलिटी ३० इंडेक्स’नुसार वाटचाल करणार आहे. ही योजना गुंतवणुकीसाठी २९ मे २०२६ रोजी खुली झाली असून येत्या १२ जून २०२६ रोजी बंद होणार आहे.
एशियन ग्रॅनिटोचा नफा १८.७४ कोटींवर
एशियन ग्रॅनिटो इंडिया लि. (एजीएल) देशातील सर्वात मोठ्या लक्झरी सर्फेसेस आणि बाथवेअर सोल्युशन्स ब्रँडपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लि. ने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मजबूत परिचालन आणि चांगली आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२६साठी कंपनीने करानंतरचा एकत्रित निव्वळ नफा १८.७४ कोटी रुपये नोंदवला.




























































