
इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्डकप विजेत्या सूर्यकुमार यादव याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्या जागी श्रेयस अय्यर याची वर्णी लागली आहे. तर तिलक वर्मा याच्याकडे उपकर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडून सर्वांचे लक्ष वेधलेल्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचीही टी-20 संघात वर्णी लागली आहे.
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. मात्र या विजयानंतर सूर्यकुमार याच्या कामगिरीत सातत्याने घसरण सुरू होती. आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सकडून खेळताना तो विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे सूर्यकुमार याची कर्णधारपदावरून गच्छंती करण्यात आली, तर दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे ही जबाबदारी देण्यात आली.
वैभव सूर्यवंशीला संधी
आयपीएल 2026 मध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या वैभव सूर्यवंशी याला हिंदुस्थानच्या टी-20 संघात संधी मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅप जिंकण्याचा कारनामा केला होता. तसेच एकाच हंगामात सर्वाधिक 72 षटकार ठोकण्याचा विक्रमही त्याने केला. ख्रिस गेल याचा विक्रम त्याने मोडीत काढला होता.
BCCI announces Team India’s T20I squad for the tours of England and Ireland. Shreyas Iyer and Tilak Varma have been announced as the Captain and Vice Captain, respectively. Vaibnhav Sooryvanshi and Prince Yadav have also been added to the squad.
(Pictures: BCCI/X) pic.twitter.com/t7vc7PJMbS
— ANI (@ANI) June 6, 2026
इंग्लंड, आयर्लंड टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ –
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी
आता पुरे करा दादा! वैभव सूर्यवंशीचा पारा चढला, शेवटी हातच जोडले; श्रीलंकेत नेमकं काय घडलं?





























































