
अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक महत्त्वपूर्ण आणि खळबळजनक दावा केला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमध्ये मोठ्या आर्थिक अनियमिततेचा आरोप त्यांनीकेला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
अखिलेश यादव यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, राम मंदिराच्या देणग्यांमधून कोट्यवधी रुपये गायब झाल्याचे आढळून आले आहे. ही जगभरातील प्रभू रामाच्या भक्तांसाठी अत्यंत संवेदनशील आणि चिंताजनक बातमी आहे. ही अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती आहे. या गंभीर प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी कोणतीही जबाबदार व्यक्ती पुढे येत नाही. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले आहे.
समस्त विश्व में भगवान राम के उपासकों के लिए ये एक बेहद संवेदनशील समाचार है कि ‘राम मंदिर’ के चढ़ावे की करोड़ों की रकम गायब पायी गई है।
ये मंदिर ट्रस्ट के लिए अत्यंत शर्मनाक स्थिति है। कोई भी सफ़ाई देने के लिए सामने नहीं आना चाहता है।
न्यायालय से स्वतः संज्ञान लेने की माँग है…
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) June 7, 2026
अखिलेश यादव यांनी या संपूर्ण प्रकरणावर सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विषयावर सरकारचे मौन अत्यंत संशयास्पद असल्याचे ते म्हणाले. राम मंदिरावर लाखो लोकांची असलेली गाढ श्रद्धा लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.























































