
रत्नागिरीत रविवारी दिवसभर कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही झाली. त्यानंतर संध्याकाळी वातावरणात बदल होत ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी 6.15 वाजता पावसाची हलक्या सरी बरसल्या. शनिवार मध्यरात्री तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला. उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक आता पावसाची वाट पाहत आहेत.
यंदा पाऊस लांबल्याने पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. काही गावांमध्ये विहिरी आटून गेल्या आहेत. पाऊस लांबल्यास रत्नागिरीत भीषण पाणटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री चिपळूण,राजापूर,लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात रिपरिप पाऊस पडला. शनिवारी तळकोकणात मॉन्सूनने प्रवेश केला असून लवकरच तो राज्यभरात पसरणार आहे.




























































