
बिहारमधील प्रसिद्ध कोचिंगचे शिक्षक खान सर यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक कट रचला असून सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा वकिलाने केला आहे. खान सर आत्मसमर्पण करणार नाहीत, ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील, अशी माहिती वकिलाने दिली आहे. खान सरांना बदनाम करण्याचा व त्यांचा छळ करण्याच्या उद्देशाने त्यांचे नाव जबरदस्तीने समाविष्ट करण्यात आले, असेही वकिलाने म्हटले.


























































