पाच दिवसांत दोन कोटींचा गुटख्याचा साठा जप्त; 195 ठिकाणी धाडी, 192 जणांना अटक, एफडीएची धडाकेबाज कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंदी असतानाही गुटखा, पानमसाला याची सर्रास विक्री करून आपला खिसा भरणाऱ्यांना अन्न औषध प्रशासन (एफडीए) विभागाने गेल्या जबरदस्त दणका दिला. या पाच दिवसात एफडीएने 195 ठिकाणी धडक कारवाई करत 192 आरोपींना बेडय़ा ठोकल्याया कारवाईत एक कोटी 99 लाख 18 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.

एफडीएच्या विविध पथकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. अशा सर्वांना आपल्या रडारवर आणत एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. 1 जून ते 5 जून या कालावधीत एफडीएच्या पथकांनी राज्यातील 195 ठिकाणी छापा टाकून एक कोटी 99 लाख 18 हजार किमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला.  या कारवाईत 192 जणांना अटक करण्यात आली. धाराशीवच्या परांडा येथून सर्वाधिक एक कोटी दोन लाख 67 हजार रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. त्यानंतर समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाका येथे 60 लाख 50 हजार, धुळ्याच्या सोनगिर येथे 23 लाख 50 हजार, नांदेड येथे 17 लाख 52 हजार रुपये तर पुण्याच्या मोशी येथे सहा लाख 19 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.