
इंधन दरवाढ, वाढलेली महागाई आणि शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘महंगाई के अच्छे दिन’ जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. रविवार, ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता क्रांतीचौकात होणाऱ्या या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकत्वाखाली हे आंदोलन होणार असून, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवसेना पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल चोरडिया, राजेंद्र काळे, विजयराव साळवे, ) सुनील शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, राजू इंगळे, संतोष खंडके, लक्ष्मीनारायण बाखरिया, किशोर कच्छवाह, बबन तात्या जाधव, रमेश सावंत, अविनाश पाटील, अंकुश सुंब, संजय पिंपळे, अरविंद धीवर, अशोक शिंदे, जगन्नाथ पवार, विठ्ठल बदर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, तालुकाप्रमुख मनाजी पाटील मिसाळ, संजय मोटे, सुभाष कानडे, दिनेश मुथा, राजू वरकड, विष्णू जाधव, दिलीप मचे, सोमीनाथ करपे, रघुनाथ घरमोडे, आनंद भालेकर, मनोज पेरे, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, तालुका संघटक मनोज गायके, विधानसभा संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, गणेश अधाने, जि. प. सदस्य संजय निकम, सुगंधा चव्हाण, केतन काजे, सुनीता चव्हाण, ललिता सोनवणे, विद्या गायकवाड, महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दातार, राखी परदेशी, सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनीता सोनवणे, भागूआक्का शिरसाठ, अरुणा भाटी, नलिनी बाहेती, सुनंदा खरात, मीरा देशपांडे, रेणुका जोशी, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, धर्मराज दानवे, जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, उमेश मोकासे व हनुमान शिंदे यांनी केले आहे.



























































