
हिंदुस्थानचा उगवता सितारा वैभव सूर्यवंशी सध्या जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. IPL 2026 च्या हंगामात तब्बल 776 धावा कुटत ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या वैभवला हिंदुस्थानी संघात संधी मिळावी, अशी मागणी अनेक दिग्गजोंनी केली होती. अखेर 6 जून रोजी BCCI ने आयर्लंड, इंग्लंड दौरा आणि एशियन गेम्स 2026 साठी हिंदुस्थानी संघाची घोषणा केली, ज्यात 15 वर्षीय वैभवच्या नावाचा समावेश करण्यात आला. या निवडीनंतर आता इंग्लंडमधील वृत्तपत्रांमध्येही वैभवचाच जलवा पाहायला मिळत असून, लॉर्ड्स कसोटीच्या (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड) चौथ्या दिवशी थेट समालोचकांमध्येही त्याचीच चर्चा रंगली होती.
लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी ब्रॉडकास्टर ‘स्काय स्पोर्ट्स’च्या शोमध्ये माजी क्रिकेटपटू मायकल आथर्टन आणि मार्क बाउचर यांनी इंग्लंडमधील 7 जूनच्या वृत्तपत्रांमधील वैभवच्या बातम्यांवर विशेष चर्चा केली. या चर्चेदरम्यान तज्ज्ञांनी सांगितले की, वैभवच्या संघ निवडीमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) सर्वात जास्त आनंदी असेल, कारण त्याच्या खेळामुळे सामन्यांच्या तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. संपूर्ण आयपीएल 2026 च्या हंगामात वैभवचा स्ट्राइक रेट 224 चा राहिला होता, ज्याचे तज्ज्ञांनी ‘अद्भूत’ असे वर्णन केले. इंग्लंडमधील चाहते आता या 15 वर्षांच्या युवा वादळाला आपल्या देशात खेळताना पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.
“I’d imagine the ECB are happy… that’ll shift a few more tickets!” 🤑
“224 SR over an entire tournament… nuts!” 🌟Elizabeth Ammon & Mark Butcher on 15-year-old Vaibhav Sooryavanshi’s selection for India’s upcoming T20I tours of England & Ireland 🇮🇳 pic.twitter.com/5onoBuV9Te
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 7, 2026























































