
चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने वार करत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथे घडली. वैशाली मंगेश पवार (22) असे हत्या केलेल्या पत्नीचे तर मंगेश निलेश पवार (25) असे आरोपी पतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथे 6 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मंगेश पवार याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केली. घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली उभी असताना पतीने तिच्यावर कोयत्याने वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 103(1) प्रमाणे व भा.द.वि. स.क. 302 अन्वये मंगेश पवार याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. आरोपी मंगेश पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.
























































