येरवडा मेंटल रुग्णालयात हत्या; रुग्णाच्या पत्नीला 22 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai High court

पुण्याच्या येरवडा मेंटल रुग्णालयात एका रुग्णाने दुसऱ्या रुग्णाची हत्या केल्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले. रुग्णालयातील प्रशासकीय हलगर्जीपणा आणि सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवत हायकोर्टाने मृत व्यक्तीच्या पत्नीला 22 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.  नोव्हेंबर 2013 मध्ये पीडित 52 वर्षीय व्यक्तीला मानसिक आजाराच्या उपचारांसाठी (सिझोफ्रेनिया) येरवडा मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच, तेथील एका हिंसक रुग्णाने मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत दोन रुग्णांचा बळी गेला होता. पीडित पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी न्यायालयात याचिका दाखल करून 29 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.