पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, रोहित पवार सरसकट कर्जमाफीवर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी व नियमांमुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने टाकलेल्या जाचक अटी-शर्ती काढून सरसकट कर्जमाफी मिळावी,’ यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे सुरू असलेले ‘अन्नत्याग’ आंदोलन दुसऱया दिवशीही सुरूच आहे. मात्र, सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. ‘दोन दिवस वाट पाहू, नाहीतर नामदेव पायरी येथे आंदोलन सुरू करू,’ असा इशारा त्यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला शेतकऱयांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रोहित पवार यांच्याशी मागण्यांबाबत फोनवरून चर्चा केली. मागण्यांप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक असल्याचे भरणे यांनी सांगितले. मात्र, ‘रोहित पवार यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी द्यावे,’ अशी ठाम भूमिका घेतल्याचे भरणे यांनी सांगितले.