
देशभरात रविवारी नीट-यूजी फेरपरीक्षा होणार आहे. मात्र, एनटीएकडून अजूनही गोंधळ सुरूच आहे. नागपुरातील अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याला चक्क अबुधाबी येथील एका शाळेतील केंद्र देण्यात आले. या विद्यार्थ्याने शुक्रवारी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते. त्यात अबुधाबी येथील परीक्षा केंद्र पाहून त्याला धक्काच बसला. अशीच एक चूक होऊन भुवनेश्वरच्या एका विद्यार्थिनीला उत्तराखंडमधील डेहराडून येथील परीक्षा केंद्र देण्यात आले. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर या चुका सुधारण्यात आल्या.

























































