
हरयाणातील राखीगढी येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने (एसआय) केलेल्या उत्खननात हडप्पाकालीन आठ सांगाडे आणि मातीची भांडी मिळाली आहेत. एएसआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सांगाडे ढिगारा क्रमांक 7 मध्ये आढळले. आतापर्यंत पाच सांगाडे बाहेर काढण्यात आले आहेत. महिलांच्या सांगाड्यांवर बांगड्या आढळल्या आहेत.
























































