
स्वित्झर्लंडने कॅनडाला 2-1 ने हरवून दमदार कामगिरी केली. या विजयामुळे स्वित्झर्लंडने ’ब’ गटामध्ये अव्वल स्थान पटकावत बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. पराभव होऊनही कॅनडानेही बाद फेरी गाठली. कारण या पराभवानंतरही कॅनडा गटात दुसऱया स्थानावर असल्यामुळे त्यांना थेट बाद फेरीत प्रवेश मिळाला आहे. दुसऱया सत्राच्या सुरुवातीला स्वित्झर्लंडने सामन्यातील पहिला गोल केला. रुबेन व्हार्गासने एक शानदार गोल करून स्वित्झर्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी लवकरच 20 वर्षीय योहान मझांबीने दुप्पट केली. सामन्याच्या 57 व्या मिनिटाला मझांबीने स्वित्झर्लंडचा दुसरा गोल करून कॅनडाला बॅकफूटवर ढकलले.


























































