
शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार गँग ऑफ गद्दारमध्ये सहभागी झाले. त्यापाठोपाठ विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर शिवसेना पक्षात सर्वकाही मिळाल्यानंतरही पळाले आणि गद्दार गटात सामील झाले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती करून पक्षात मानाचे स्थान देण्यात आले. विधान परिषदेवर आमदार म्हणूनही त्यांना शिवसेनेकडून पाठविण्यात आले. यासह पक्षात आणि कामगार संघटनेत अनेक पदे देऊनही सचिन अहिर विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेनेतून पळाले आणि गद्दार गटात सामील झाल्याने शिवसैनिकांबरोबर जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
काय काय दिले…
- उपनेतेपद
- आमदारकी
- पुणे जिल्हा संपर्कप्रमुख
- भारतीय कामगार सेना सरचिटणीस
- ‘बेस्ट’ कामगार सेना अध्यक्ष
- मुलीला प्रभाग समिती
- भावाला ‘बेस्ट’ समिती सदस्यपद


































































