एआयच्या वापरासाठी ‘एसओपी’ तयार करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एसओपी (प्रमाणित कार्यपद्धती) तयार करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील तज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या शिफारशींच्या आधारावर एसओपी तयार करण्यात येतील अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिली. एआयवर केंद्राचेही धोरण तयार होत आहे. या समितीचा अहवाल आल्यावर राज्याचा अहवाल पेंद्राला पाठवला जाईल. राज्याचा अहवाल पेंद्राच्या धोरणात समावेश केला जाईल असे योगेश कदम म्हणाले. यासंदर्भात अजित पवार गटाच्या सना मलिक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.