असं झालं तर… चेकबुक हरवलंय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cheque

चेकबुक हरवणे किंवा चोरीला जाणे ही एक गंभीर समस्या आहे, कारण त्याचा गैरवापर करून तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.

ताबडतोब तुमच्या बँकेला कळवा. जितक्या लवकर बँकेला कळवाल तितके नुकसान होण्याचा धोका कमी होतो. जर तुम्ही बँकेला कळवलं तर तुम्ही स्वतःला वाचवू शकता.

बँकेच्या नियमांनुसार ग्राहकाने वेळेत माहिती दिली नाही आणि त्या दरम्यान फसवे व्यवहार झाले, तर त्याची काही प्रमाणात जबाबदारी ग्राहकावरही येऊ शकते.

तुम्ही बँकेच्या अॅपद्वारे तुमचे चेकबुक ब्लॉक करू शकता, जिथे तुम्हाला स्टॉप पेमेंट किंवा चेकबुक सेवांसारखे पर्याय मिळू शकतात. चेकबुक ब्लॉक करण्यासाठी अर्ज करू शकता.

तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून चेकबुक हरवले किंवा चोरीला गेले आहे याची माहिती दिली की, तुमच्या विनंतीनुसार कस्टमर केअर तुमचे चेकबुक ब्लॉक करतात.