
भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय आंतर-राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत हर्ष राऊतने 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत कांस्यपदक जिंकले. हर्षने शर्यतीची सुरुवात करतानाच पदक जिंकण्याची मोठी संधी निर्माण केली. हर्ष 10 ते 12 जुलै 2026 दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या पहिल्या आशियाई 23 वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या मोठय़ा स्पर्धेत सहभागी होणारा तो ठाणे जिह्यातील पहिलाच खेळाडू आहे. हर्षने यापूर्वी वर्ल्ड अॅथलेटिक्स रिले चॅम्पियनशिप आणि आशियाई अॅथलेटिक्स रिले चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. हर्षला प्रशिक्षक नीलेश पाटकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.





























































