मंत्री नितेश राणे यांना तोडफोडप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यातील टोलनाक्यावर 2013 मध्ये केलेल्या तोडफोड आणि मारहाण प्रकरणात सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे गोव्याच्या म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने महाराष्ट्राचे बंदरे विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान नितेश राणे न्यायालयात उपस्थित न राहिल्याने कोर्टाने कडक भूमिका घेत हे वॉरंट जारी केले असून, त्यांना पुढील सुनावणीस म्हणजेच सोमवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.