दिल्लीत निर्माणाधीन पाच मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले; बचावकार्य सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील रोहिणी सेक्टर १६ मध्ये निर्माणाधीन पाच मजली इमारत बुधवारी कोसळली. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाची चार वाहने, पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मदत आणि बचावकार्यात एनडीआरएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

टीव्ही ९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघातामुळे परिसरात घबराट पसरली आहे. अडकलेल्यांमध्ये कामगार आणि नागरिकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळते. ढिगारा हटवण्यासाठी आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीसह अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची नेमकी संख्या समजू शकली नाही. दुर्घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला आहे.