
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या सर्व फेऱ्या पूर्ण होऊनही शिल्लक राहणाऱ्या एमबीबीएसच्या जागा भरण्याची परवानगी मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. जागा रिक्त राहिल्यास विद्यार्थ्यांसह कॉलेजचेही नुकसान होईल, आपल्याकडे विद्यार्थ्यांची कमतरता नाही, पण सर्व जागा भरल्या पाहिजेत अशी प्रक्रिया राबवणे गरजेचे असल्याचे सुनावत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. इतकेच नव्हे तर पुढील आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह अन्य काही महाविद्यालयांनी हायकोर्टात
ऍड. एम. व्ही. थोरात, ऍड. पूजा थोरात यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे.
























































