
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदावर सलील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे पक्षाचे जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सलील देशमुख यांना नियुक्तीचे अधिपृत पत्र प्रदान करण्यात आले. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या समन्वयकपदीदेखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात आगामी काळात होणाऱया निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सलील देशमुख यांची नागपूर ग्रामीणची जबाबदारी राष्ट्रवादीकडून सोपविण्यात आली आहे. यामुळे नागपूर जिह्यातील पक्षसंघटनेला एक नवीन संजीवनी आणि तरुण ऊर्जा मिळणार आहे. दरम्यान नियुक्ती पत्र घेतल्यानंतर सलील देशमुख यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.
























































