
कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील धडक मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक तरुण तरुणी जखमी झाले आहेत. या हल्ल्यात तरुणांची डोकी फोडली. विद्यार्थिनींचे कपडे फाडले. शेकडो तरुण जखमी झाले. याचा संपूर्ण देशभरातून निषेध होत आहे. या घटनेवरून संसदेतही विरोधक आक्रमक झाले त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी संसदेचे कामकाज ठप्प राहिले.
लाठ्या-काठ्या न्यायाचा आवाज दाबू शकत नाहीत!!!#लोकसभा #ShivsenaUBT #INDIA pic.twitter.com/NJyrptOl2f
— Arvind Sawant (@AGSawant) July 21, 2026
दरम्यान शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत या घटनेचा निषेध करणारे पोस्टर झळकवले. या पोस्टरवर ‘Batons Can’t Silence Justice’ (लाठ्या-काठ्या न्यायाचा आवाज दाबू शकत नाहीत) असे लिहले होते. सावंत यांनी स्वत: सोशल मीडियावर त्यांच्या लोकसभेतील हा फोटो शेअर केला आहे.
शिवसेना खासदारांनी घेतली अभिजीत दिपके यांची भेट
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी नवी दिल्लीत जंतरमंतरवर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या तरुणांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तरुणांचे म्हणणे एकून घेतले. तरुणांनी सरकारने केलेली दडपशाही आणि विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानूष मारहाणीचीही माहिती दिली





























































