मुसळधार पावसाचा फटका; वैष्णोदेवी, अमरनाथ यात्रा चार दिवसांपासून स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीर आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने वैष्णो देवी मंदिर, अमरनाथ यात्रा आणि चारधाम यात्रेवर परिणाम झाला असून जम्मूतील वैष्णो देवी यात्रा आणि कश्मीरमधील अमरनाथ यात्रा मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि पुरामुळे सलग चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आल्या आहेत.

जम्मू आणि कश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी वैष्णो देवीचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या अर्धकुमारी भवनकडे जाणाऱ्या नवीन मार्गावर मोठे भूस्खलन झाले. यामुळे या मार्गावरील यात्रेकरूंची वाहतूक आणि बॅटरी कार सेवा स्थगित करण्यात आली. येथील शाळाही 26 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.