
छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि बलिदानाची साक्ष देणारा धर्मवीर गड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या गडाचे जतन, संरक्षण आणि सुशोभीकरण करता येणार आहे. सांस्कृतिक विभागाने हा आदेश काढला. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा पेडगाव येथे हा गड आहे. एकूण 3 लाख 77 हजार 300 चौरस मीटर क्षेत्र संरक्षित केले जाणार असून त्यात रामेश्वर, भैरवनाथ, मल्लिकार्जुन ही मंदिरे, वाडे व महाराजांच्या स्मारकाचा समावेश आहे.


























































