
रशियातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक उत्तर काकेशस भागातील काबार्डिनो-बाल्कारीया प्रदेशातील माऊंट मिझिर्गी शिखरावर हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठी 50 हून अधिक पथके प्रयत्न करत आहेत. शिखरावर 33 गिर्यारोहकांचा एक गट गिर्यारोहणासाठी गेला होता, मात्र त्याचवेळी हिमस्खलन झाल्याची माहिती आपत्कालीन मंत्रालयाच्या स्थानिक शाखेने दिली.



























































