रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन शुक्रवारपासून हिंदुस्थान दौऱ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

11 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हिंदुस्थानला भेट देणार आहेत. ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीपूर्वी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. गेल्या 9 महिन्यांत पुतीन हे दुसऱ्यांदा हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आणि पुतीन यांच्यामधील बैठकीत व्यापार, आर्थिक सहकार्य आणि वाहतूक या संबंधित मुद्द्यांवर चर्चा शक्यता आहे.