विधानसभा निवडणुकांच्या काळात भाजपला 1,472.8 कोटी रुपयांची देणगी; आसाममध्ये सर्वाधिक खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
FIR Filed Against BJP’s X Account for ‘Scamlord’ Poster Targeting CM Siddaramaiah

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मागील टप्प्यात भाजपला एकूण 1,472.8 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या विवरणपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे.

6 मे रोजी निवडणुका पूर्ण झाल्यानंतर भाजपच्या खात्यातील अखेरची शिल्लक 7,627.2 कोटी रुपये झाली. 15 मार्च 2026 रोजी ही शिल्लक 6,722.6 कोटी रुपये होती. त्यामुळे या कालावधीत पक्षाच्या शिल्लकीत 904.6 कोटी रुपयांची वाढ झाली.

आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने संबंधित राज्य आणि जिल्हा कार्यकारणीच्या माध्यमातून एकूण 160 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये आसाममध्ये सर्वाधिक 96.3 कोटी रुपये, तामिळनाडूमध्ये 51.6 कोटी रुपये, तर पुद्दुचेरीमध्ये 11.9 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या तीन राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपने सामान्य पक्षप्रचारावर 130.4 कोटी रुपये खर्च केले.

दरम्यान, पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या निवडणूक खर्चाची विवरणपत्रे अद्याप निवडणूक आयोगाने सार्वजनिक केलेली नाहीत.

आसाममध्ये 96.3 कोटींचा खर्च

आसाममधील भाजपच्या निवडणूक खर्चाच्या विवरणपत्रानुसार, पक्षाने सामान्य पक्षप्रचारावर 76.7 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये भाजपने केलेल्या 23.1 कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. याशिवाय उमेदवारांसाठी 19.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

आसाममध्ये स्टार प्रचारकांच्या प्रवासासाठी 27.3 कोटी रुपये, जाहिरातींसाठी 37 कोटी रुपये, प्रचार साहित्यावर 8.9 कोटी रुपये, तर इतर खर्चासाठी 2.3 कोटी रुपये खर्च करण्यात आले.