महिला व बालविकास मंत्र्यांच्याच जिल्ह्यात चिमुकल्यांचे ‘अंगण’ असुरक्षित, रायगडात २११ अंगणवाड्या भाड्याच्या जागेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रणय पाटील

महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नगड जिल्ह्यातच शेकडो चिमुकल्यांचे गण’ असुरक्षित असल्याचे समोर आले हे. जिल्ह्यात अद्यापही २११ अंगणवाड्या ड्याच्या जागेत तर काही ठिकाणी मंदिर, नाजमंदिर आणि व्यायामशाळांसारख्या काणी सुरू आहेत. यामुळे मुलांच्या सुरक्षेचा न गंभीर बनला असून या अंगणवाड्यांना काच्या इमारती मिळणार कधी, असा बाल पालकांनी विचारला आहे. दरम्यान बाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन नाडोळा करत असल्याने शिक्षणाची पहिली परीच कमकुवत झाली आहे.

रायगड जिल्ह्यात एकूण ३ हजार १६१ गणवाड्या आहेत. त्यापैकी २ हजार ९५० राणवाड्या शासकीय इमारतींमध्ये भरत सल्या तरी उर्वरित २११ अंगणवाड्यांसाठी चाप कायमस्वरूपी जागेचा प्रश्न कायम आहे. लशिक्षणाचा पाया मजबूत करण्याच्या घोषणा असताना स्वतःची इमारत नसल्याने अनेक गणवाड्यांना उपलब्ध होईल त्या जागेचा धार घ्यावा लागत आहे. काही ठिकाणी दरांमध्ये, समाजमंदिरांमध्ये तर काही ठिकाणी यामशाळांमध्ये अंगणवाड्या भरवल्या जात नून येथे अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचाच नाव असल्याचे चित्र आहे.

तुटक्या खिडक्या, वाढलेली झुडपे

अनेक अंगणवाडी इमारतींच्या खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. इमारतीच्या परिसरात झाडे-झुडपे वाढल्याने अस्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुलांना अशा परिसरात दिवसभर ठेवताना एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसल्याने कोंदट वातावरणात चिमुकल्यांना बसावे लागत आहे.

लघुशंकेसाठी घरचा रस्ता

सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधाच उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. परिणामी लहान मुलांना गरज भासल्यास अंगणवाडी सोडून थेट आपल्या घरी जावे लागते. मुली आणि लहान वयातील बाल कांच्या दृष्टीने ही परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. ‘स्वच्छता’ आणि ‘बालसुरक्षा’ याबाबत मोठमोठ्या योजना राबवल्या जात असताना अंगणवाड्यांमध्ये साधे शौचालयही उपलब्ध नसणे ही यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

योजनांच्या अंमलबजावणीचे काय?
आहार शिजवण्यासाठी चक्क कपडा टाकून आडोसा तयार करण्याची वेळ आली आहे. बालकांच्या शिक्षणाचा आणि पोषणाचा पाया मजबूत करण्यासाठी शासनाकडून विविध योजना आणि घोषणा केल्या जातात. मात्र महिला व बाल विकास मंत्र्यांच्याच जिल्ह्यात अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती, शौचालय, स्वच्छ परिसर, पुरेसा प्रकाश आणि सुरक्षित वातावरणासाठी संघर्ष करावा लागत असेल तर या योजनांची अंमलबजावणी नेमकी कुठे आणि कशी होते, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

अंगणवाड्यांमध्ये बालकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. २११ इमारतींसाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग