
तामीळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून एआयच्या मदतीने तयार केलेले व्हिडीओ, छायाचित्रे तसेच विविध पोस्ट प्रसारित केल्याच्या कथित प्रकरणाचा तपास मंगळवारी जळगाव जिह्यातील नशिराबादपर्यंत येऊन पोहचला. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई पश्चिम विभाग सायबर गुन्हे पोलिसांच्या पथकाने नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याला चौकशीसाठी ताब्यातही घेतले आहे.

























































