पन्नाशीनंतर जोडप्याला व्हायचेय आईबाबा; सरोगसीसाठी पत्नीच्या वयाचा अडथळा, हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वयाची पन्नाशी ओलांडलेल्या एका जोडप्याला आईबाबा व्हायचे आहे. त्यासाठी त्यांनी सरोगसीचा पर्याय निवडला आहे. ही प्रक्रिया करणाऱ्या जोडप्याला वयाची अट घालण्यात आली आहे. पत्नीच्या वयाचा अडथळा येत असल्याने या जोडप्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस धाडली आहे.

न्या. भारती डांगरे व न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. याप्रकरणात कायदेशीर सल्ल्यासाठी एका वकिलाची अॅम्याकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच सक्षम प्राधिकरणाला नोटीस जारी करत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.

आयव्हीएफचे अपयश

बाळ होण्यासाठी या जोडप्याने आयव्हीएफने प्रयत्न केले. त्यात त्यांना यश मिळाले नाही. डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांनी सरोगसीचा पर्याय निवडला. पत्नीचे वय 50 पेक्षा अधिक असल्याने सक्षम प्राधिकरणाने या प्रक्रियेस नकार दिला.