
अंधेरीत एमडी विकण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीकडून तब्बल 153.6 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 4 लाख 60 हजार रुपये आहे. वांद्रे युनिटच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचण्यात आला. अंधेरी पश्चिम येथील सी.डी. बर्फीवाला रोड परिसरातील सार्वजनिक ठिकाणी एमडी विक्रीसाठी घेऊन जाणाऱया एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहम्मद जमीर अब्दुल अजीज खान (36) असे त्याचे नाव आहे.
























































