Ratnagiri News – महामार्गावर बावनदी येथे कारची मोटारसायकलला पाठीमागून धडक; युवक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर बावनदी, संगमेश्वर येथे रविवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास कारने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार तेजस विनायक मेस्त्री (वय २३, रा. वेळवंड, ता. रत्नागिरी) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे .

तेजस याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलविण्यात आली असून, महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल बळीराम शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रामपुरे, बाबू खोंदल, यांनी घटनास्थळी जावून वाहतूक सुरळीत केली तसेच जखमींला रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवले.