सुदानमध्ये सोन्याची खाण कोसळली; 11 कामगार ठार, 30 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुदानमध्ये सोन्याची खाण कोसळून 11 कामगारांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. आठवडाभरातील ही दुसरी दुर्घटना आहे. ईशान्य सुदानमधील रेड सी राज्यात ही घटना घडलसी. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे. आठवडाभरापूर्वी, पश्चिम सुदानमधील खाण कोसळून 82 जणांचा मृत्यू झाला होता.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रेड सी राज्यातील ओनी या दुर्गम प्रदेशात हा अपघात घडला. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 30 जणांना वाचवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचाव कार्य सुरू केले. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले असून त्यांचा शोध सुरू आहे.