
IPL च्या सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जातो. चेन्नईच्या या यशामध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचा मोठा वाटा होता. मात्र, त्यांनी 18 वर्ष संघाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे चेन्नईचा संघ नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात होता. आता त्यांचा हा शोध संपला असून टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानची चेन्नईने मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे.
स्टीफन फ्लेमिंग यांनी जुलैमध्ये इंग्लंडच्या कसोटी संघाचे हेड कोच म्हणून पदभार स्वीकारल्यामुळे त्यांचा CSK सोबतचा हा दीर्घ प्रवास संपला आहे. आता जहीर खानच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईचा संघ विक्रमी सहावे विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. 2017 मध्ये खेळाडू म्हणून आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर जहीर खानने विविध फ्रँचायझींसोबत महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. त्याने मुंबई इंडियंसमध्ये ‘संचालक क्रिकेट ऑपरेशन्स’ आणि ग्लोबल डेव्हलपमेंट प्रमुख म्हणून काम पाहिले असून, त्यानंतर तो लखनऊ सुपर जायंट्ससोबतही जोडला गेला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशासाठी 610 विकेट्स आणि आयपीएलमध्ये 102 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आगामी आयपीएलमध्ये चेन्नईचा खेळ जहीर खानच्या मार्गदर्शनाखाली कशापद्धतीने बहरतो, ते पाहण्यासाठी आता चाहतेही उत्सुक झाले असावेत.
ZAK HERE FOR THE PRIDE! 🦁#WhistlePodu for the Head Coach of Chennai Super Kings! 🥳💛
Read more, Link –https://t.co/v8muYn4yVA pic.twitter.com/eQChQ6yDEB
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 21, 2026



























































