
क्राईम ब्रँच अधिकाऱयाच्या मोबाईलवर डीपी ठेवून मॉडेलकडून पैसे उकळणाऱया परदेशी नागरिकाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. जयप्रकाश कालिचरण असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
संभाजीनगर येथे मॉडेल राहतो. काही दिवसांपूर्वी मॉडेल हे एका मित्राच्या पार्टीमध्ये गेले होते. त्या पार्टीदरम्यान जयप्रकाशसोबत त्याची ओळख झाली होती. ओळखीनंतर जयप्रकाश आणि मॉडेल हे एकमेकांच्या संपर्कात आले. जयप्रकाशने तो मॉरिशियसचा रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच मॉडेलिंगचे काम देऊन दिवसाला दहा हजार रुपये देऊ असे सांगितले होते. गेल्या ऑक्टोबर महिन्यात जयप्रकाश कुटुंबीयांना त्याच्या अपहरणाचा बनावट पह्न आला होता. अपहरणप्रकरणी मॉरिशियस दूतावासाने हिंदुस्थानी दूतावासाला संपर्क केला. त्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट 9 कडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी चौकशी केली तेव्हा अपहरण झाले नसल्याचे समोर आले. त्याचदरम्यान जयप्रकाशला क्राईम ब्रँचच्या एका अधिकाऱयाचा नंबर मिळाला.
त्या अधिकाऱयाचा डीपी ठेवून दुसऱया नंबरवरून जयप्रकाश हा मॉडेलला मेसेज करायचा. विविध कारण आणि भीती दाखवून जयप्रकाश हा मॉडेलकडून पैसे उकळत होता. जयप्रकाश हा फसवणूक करत असल्याचे मॉडेलच्या लक्षात आले. त्याने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. मॉडेलच्या तक्रारीवरून पोलिसांनी जयप्रकाशविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक राजेश देवरे यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना जयप्रकाशची माहिती मिळाली. जयप्रकाशला पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. जयप्रकाशने हिंदुस्थानात आतापर्यंत अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली, त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का, याचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत.






























































